Breaking News

पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्याकडून गोरगरिबांना अन्नदान

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या कुटुंबियांना अन्नदान केले जात आहे. सध्या भारत देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये व महामारीला सामोरे जावे लागू नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र यामुळे अनेकांचे हातावर पोट असणार्‍यांचे दोनवेळच्या जेवणाचेही हाल होत आहेत. पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड या हजारो कामगारांचे, गरीबांचे अन्नदाते म्हणून रोज अन्नदान करीत आहेत. कळंबोली, रोडपाली, कामोठे या भागात जगदीश गायकवाड अशा गरीब व हातावर पोट असलेल्या लोकांकरिता अहोरात्र मेहनत घेऊन पोटाला आधार म्हणून पोटभर जेवण देत असल्याने पनवेलमधील अनेक गरीब, निराधार, कष्टकरी लोक जगदीश गायकवाड यांना आशीर्वाद देत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply