Breaking News

बँक ऑफ बडोदाच्या शेकडो शाखा होणार बंद?

मुंबई ः प्रतिनिधी

सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे. देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे 1 एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात विलीनीकरण करण्यात आले होते.  देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणापासून याबाबत विचार सुरू आहे. आता या तीन बँकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने काही दिवसांत तब्बल 800 ते 900 शाखांना टाळे लागण्याची किंवा इतर शाखांमध्ये विलीन करण्याची तयारी सुरू आहे.

एप्रिल महिन्यापासूनच बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार काही शाखांचे अन्यत्र स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणानंतर एकाच ठिकाणी दोन्ही बँकांच्या शाखा चालविण्यात येत होत्या. अनेक ठिकाणी तर तिन्ही बँकांच्या शाखा एकाच इमारतीमध्ये चालत असल्याचे आढळून आले. तिन्ही बँकांची प्रादेशिक आणि क्षेत्रीय कार्यालयेही एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अतिरिक्त शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बँक ऑफ बडोदाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

अतिरिक्त खर्च रोखण्यासाठी काही शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता एप्रिलपासून बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत असल्याचेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले. त्यानुसार काही शाखांचे अन्य ठिकाणी स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत.

सध्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारतात बँकेची स्थिती चांगली आहे, मात्र पूर्वेकडील राज्यात अजून तितकासा प्रसार झालेला नाही. त्यामुळे आताच्या घडीला चालू असलेल्या अनावश्यक प्रादेशिक व क्षेत्रीय शाखा बंद करून येत्या काळात देशाच्या पूर्व भागात विस्तार करण्याची योजना आखण्यात आल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले. बँक ऑफ बडोदाच्या देशभरात 9,500 शाखा आहेत. या बँकेचे 13 हजार 400 एटीएम आहेत, तर एकूण कर्मचारीसंख्या 85 हजार असून, ग्राहकसंख्या 12 कोटी आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply