Breaking News

पनवेलमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 11) भाजप प्रभाग क्रमांक 19 आणि सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तिरंगा वाटप करण्यात आले. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना तिरंगा देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. मिडल क्लास सोसायटी परिसरात तिरंगा वाटप करण्यास सुरुवात झाली. या वेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाले, उल्हास झुंजारराव, संदीप पाटील, अमेय देशमुख. प्रद्युम खुटले, स्वरूप वाणी, संतोष कुंवर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply