नगरसेविका दर्शना भोईर यांच्याकडून पीएम निधीत मानधन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगरसेवकपदाच्या एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. लॉकडाऊन परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील आर्थिक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे, त्या अनुषंगाने आर्थिक मदत म्हणून पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले एक महिन्याचे नगरसेवकपदाचे मानधन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात त्यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन हे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधीत वर्ग करण्याचे कळविले आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply