Breaking News

सदानंद गायकवाड यांच्याकडून कामगारांना जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये. त्या कारणाने सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्‍यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सदानंद इंजिनिअरिंग वर्क्स उरण यांच्या वतीने कंपनीचे प्रोप्रायटर सदानंद सखाराम गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 3) आपल्या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी सदानंद इंजिनिअरिंग वर्क्स उरण कंपनीचे प्रोप्रायटर सदानंद सखाराम गायकवाड, मुलगे संदीप गायकवाड, सिद्धेश गायकवाड, जावई मनीष कुंडेलवाल, स्टाफ आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने रोज काम करून हातावर कमावणारे याचे काम बंद झाले, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीचा हात देण्याचे मी काम करीत आहे. आजपर्यंत गोरगरिबांची सेवा केली. गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मी मानतो. माझे वडील सखाराम सावळाराम गायकवाड यांच्याकडून गरीबांच्या सेवेचे व्रत घेतले आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून गरिबांची सेवा मी केली आहे, समाजासाठी आपले देणं लागतो या उद्देशाने मी गरिबांना मदत करीत असतो, असे सदानंद गायकवाड यांनी सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply