Breaking News

कोरोनाच्या लढाईत बौद्धजन पंचायतीचा मदतीचा हात

पाली ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटात मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत सुधागड तालुका बौद्धजन पंचायत संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजारांचा धनादेश देण्यात आला. सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे नुकताच संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी धनादेश सुपूर्द केला.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासह नरेश शिंदे, प्रभाकर गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, मोरेश्वर कांबळे, राजेश गायकवाड, भगवान शिंदे, रोहिणी जाधव तसेच संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply