खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवशी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अशाचप्रकारे मंगळवारी त्यांनी त्यांचा मुलगा हर्षिल याच्या वाढदिवसानिमित्तही वस्तूंचे वाटप केले होते.
अमर म्हात्रे यांच्या पुढाकाराने बँकांमध्ये सॅनिटायझर फवारणी
उलवे नोड : वहाळ ग्रामपंचायत व उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या पुढाकाराने परिसरातील बँकांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.