नवी दिल्ली ः आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायुगळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. येथे एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. विषारी वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांत जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल ट्विट केले आहे. येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, गृहमंत्राल व एनडीएमआयशी याबाबत बोलणे झाल्याचेही ते म्हणाले.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …