पनवेल : वार्ताहर
कोरोना या गंभीर साथीचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास तसेच प्रवास करण्यास मनाई केलेली असतानाही त्याचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक महाराष्ट्र पोलिसांचा बनावट ई पास बनवून तो घेवुन फिरत असलेल्या एका व्यक्तीस तुर्र्भे पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. राज भानूशाली असे या व्यक्तीचे नाव असून तो तुर्भे स्टोअर परिसरात बनावट ई पास बनवून सरकारी दस्ताऐवज असल्याचे माहित असतानाही त्याचे बनावट कागदपत्रे बनवून ते जवळ बाळगून फसवणुकीच्या उद्देशाने तो वापर करीत असल्याचे तुर्भे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. व्ही. डोम यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध भादवी कलम 188, 269, 270, 465, 468, 471 सह साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3 अन्वये कारवाई केली आहे.