Breaking News

बुद्धपौर्णिमा ऑनलाइन साजरी

खारघर : प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आले असल्याने सण, कार्यक्रम, मेळावे रद्द करायला लागले आहेत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रम लॉकडाउनच्या काळात घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने साजरे केले जात आहेत. सत्याग्रह महाविद्यालयाच्या पाली व बुद्धिझम विभागाच्या मार्फत ऑनलाइन बुद्धपौर्णिमा झूम अ‍ॅपच्या साहाय्याने साजरी करण्यात आली.

या वेळी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला. ऑनलाइनच बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी के डोंगरगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी बुद्धपौर्णिच्या निमित्ताने ऑनलाइनच छोटेखानी कार्यक्रम झाले. या वेळी नागपूर दीक्षाभूमी येथून भदंत डॉ. ज्ञानदीप महाथेरो यांनी सर्वाना त्रिसरण पंचशील दिले. डोंगरगावकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. बुद्धाविषयी कविता आणि त्यांच्या जीवनमानात महत्वाच्या घटनांचे पठण करण्यात आले. या वेळी प्राध्यापक अनील गायकवाड यांनी देखीक जगभरातील कुटुंब संस्था, जात संस्था, राज्यसंस्थेमध्ये हुकूमशाहीचा होणार वापर यावर मार्गदर्शन केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply