Breaking News

लॉकडाऊनमुळे पीरवाडी किनारा सामसूम

उरण : वार्ताहर

उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या पीरवाडी समुद्र किनारा एप्रिल व मे महिन्यात पर्यटकांनी फुलून जात असे. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या छोटया व्यवसाईक यांना उदरनिर्वाह साधन  होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यामुळे छोट्या टपरी धारकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या निसर्ग रम्य ठिकाणी व अथांग असलेला समुद्र किनारा फेसाळ अशा समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी दर वर्षी एप्रिल व मेमहिन्यांत पर्यटकांची गर्दीहोर असे पीरवाडी समुद्र किनारा, लागुनच असलेला पीर दर्गा व समुद्र किनारी असलेली उंचच्या उंच नारळी पोफळीची सुंदर गर्द झाडी निसर्ग रम्य ठिकाण पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, बदलापूर, वाशी, भाऊचा धक्का येथून पर्यटक येत असतात उन्हाळ्याच्या सुटीत व रविवारी तर समुद्रकिनार्‍याला यात्रेचे स्वरूप येत असे आलेल्या पर्यटकांमुळे किनार्‍यावर असलेल्या दुकान दारांना स्थानिकांना उत्पन्नाचे साधन होत असे, पीरवाडी समुद्र किनारी, शेंगा, मका, सरबत व इतर खाद्य पदार्थ स्टॉल आहेत.

संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. एकही पर्यटक फिरकत नाही त्यामुळे समुद्र किनारी शांतता पसरलेली आहे. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या खाद्य पदार्थांच्या टपर्‍या बंद झाल्या आहेत. व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या सर्वांना आता लॉकडाऊनची बंदी उठण्याची प्रतीक्षाच लागून राहिली आहे.

पीरवाडी समुद्र किनारी आमची भुईमुगाच्या शेंगा विकण्याच्या दोन हात गाडी आहे. पिरवाड येथे येणार्‍या पर्यटकमुळे आमच्या कुटुंबाला रोजगार मिळतो आमचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे पीरवाडी समुद्र किनारी येणारे पर्यटक होय. लॉकडाऊनमुळे येणारे पर्यटक बंद झाले. त्यामुळे आमच्या कुटुंबाला  मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे आमच्यासारख्या इतर व्यावसायिकांनाही हि मोठा फटका बसला आहे. – हेमलता विश्वनाथ पाटील, शेंगा विक्रेती, पिरवाड

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply