Breaking News

वृक्षतोड, दारूभट्ट्यांप्रकरणी कारवाई

वनविभागाकडून कर्जतमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

वार्ताहर : विलास श्रीखंडे : कर्जत तालुक्यातील वनपरिक्षेत्र पूर्व अंतर्गत येणार्‍या खांडपे राऊंडमधील मुंढेवाडी गावालगत असणार्‍या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड व जंगल क्षेत्रात दारूभट्टी करणे या गुन्ह्यांतर्गत मुंढेवाडी येथील शरद शंकर ठोंबरे आणि तुळशीराम हरी खैर या दोघांविरोधात वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26(1) ब, क, ड, ई अन्वये कर्जत पूर्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीमने आरोपींवर गुन्हा दाखल करत जेरबंद केले असल्याने आता सर्वांचे धाबेच दणाणले आहेत.

कर्जत पूर्व वनपरिक्षेत्रामध्ये येणार्‍या खांडपे राऊंडमधील कोंदीवडे ग्रामपंचायत हद्दीतील मुंढेवाडी लगत असणार्‍या जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून राखीव वनात अवैधरीत्या वृक्षतोड व जंगल क्षेत्रात दारूभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी पूर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी यांच्या नेतृत्वाखाली खांडपे राऊंडचे वनपाल लांघी यांनी आपल्या टीमच्या साह्याने सापळा रचत केलेल्या कारवाईत हे आरोपी बरोबर अडकल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षकांच्या टीमने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनीही आपला गुन्हा मान्य केल्याने मधे त्यांना कोर्टाने एका दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली.

खांडपे राऊंडमध्ये येणार्‍या मुंढेवाडी गावालगत असणार्‍या जंगलात काही तासाच्या अंतरावर  70 ते 80 वर्षापूर्वीची जुनी सागवण वृक्ष आहेत. त्यांचा घेर 250 सेंटीमीटरच्या वर असून त्या ठिकाणी अशी अनेक जुनी सागाची झाडे आहेत. या जुन्या सागाच्या झाडांना स्थानिक लोक राम- लक्ष्मण या नावाने संबोधतात. या राऊंडमध्ये दोन हजार हेक्टरच्या वर वनक्षेत्र असून 16 गाव आणि काही आदिवासी वाड्यांचा येथे समावेश होत आहे, तर येथे एक वनपाल आणि चार वनरक्षक जंगलाची देखरेख करत आहेत. त्यामुळे वनविभागाने आता केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply