Breaking News

पॅराथायरॉईडग्रस्त चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई ः बातमीदार

दुर्मीळ असा जन्मजात आजार असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळावर अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील स्पेशालिस्ट सर्जन्सच्या टीमने पॅराथायरॉईड ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे.  या बाळाला जन्मापासून सुस्तपणा, चिडचिडेपणा आणि कोणत्याही क्रियेमध्ये उत्तेजन न देणे असे त्रास होत होते. अधिक तपासणीनंतर त्याला लहान बाळांना होणारा गंभीर हाइपोपॅराथायरॉईडीझम हा पॅराथायरॉईड ग्रंथीचा दुर्मीळ आनुवंशिक आजार असल्याचे निष्पन्न झाले.  या आजारामुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीचे नियमन केले जात नाही. ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, थायरॉईड आणि पॅराथायरॉईडचे व डोके आणि मानेच्या कर्करोग शस्त्रक्रियांचे विशेषज्ञ डॉ. अनिल डिक्रुझ आणि त्यांच्या टीमने बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता बाळ स्थिरपणे प्रगती करीत आहे. त्याचा चिडचिडेपणा कमी होऊन ते पूर्वीपेक्षा जास्त उत्साही व सक्रिय बनले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply