Breaking News

विचुंबे येथील कृष्ण वंदना, साई ऐश्वर्या इमारत कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः रामप्रहर वृत्त

 रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे कोरोना विषाणूबाधित व्यक्ती आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या विचुंबे ता. पनवेल येथील कृष्ण वंदना को. ऑ. हौ. सो. आणि येथील सेंट थॉमस शाळेजवळील साई ऐश्वर्या बिल्डिंग कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे.

 या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply