Breaking News

पॅराथायरॉईडग्रस्त चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई ः बातमीदार

दुर्मीळ असा जन्मजात आजार असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळावर अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील स्पेशालिस्ट सर्जन्सच्या टीमने पॅराथायरॉईड ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे.  या बाळाला जन्मापासून सुस्तपणा, चिडचिडेपणा आणि कोणत्याही क्रियेमध्ये उत्तेजन न देणे असे त्रास होत होते. अधिक तपासणीनंतर त्याला लहान बाळांना होणारा गंभीर हाइपोपॅराथायरॉईडीझम हा पॅराथायरॉईड ग्रंथीचा दुर्मीळ आनुवंशिक आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारामुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीचे नियमन केले जात नाही. ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, थायरॉईड आणि पॅराथायरॉईडचे व डोके आणि मानेच्या कर्करोग शस्त्रक्रियांचे विशेषज्ञ डॉ. अनिल डिक्रुझ आणि त्यांच्या टीमने बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता बाळ स्थिरपणे प्रगती करीत आहे. त्याचा चिडचिडेपणा कमी होऊन ते पूर्वीपेक्षा जास्त उत्साही व सक्रिय बनले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply