खोपोली ः प्रतिनिधी
रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्याकडे आयुर्वेदिक गोळ्यांची पाकिटे सुपूर्द करण्यात आली. या वेळी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक राकेश पाठक, तालुका कार्यवाह अविनाश मोरे, आयुर्वेद व्यासपीठाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. नलीन शहा, महामार्ग प्रमुख रोहित कुलकर्णी, अतुल कोठारी आदी उपस्थित होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे प्रमुख गुरू साठीलकर व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांसाठीही आयुर्वेद व्यासपीठाचे डॉ. नलिन शहा यांनी आयुर्वेदिक गोळ्यांची पाकिटे सुपूर्द केली.