Breaking News

मिनीडोअर, टॅक्सीचालकांना अर्थसहाय्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांना निवेदन

पेण ः प्रतिनिधी – शेअर पद्धतीने प्रवासी सेवा देणार्‍या विक्रम, मिनीडोअर, इको, टाटा मॅजिक टॅक्सीचालकांना अर्थसहाय्य मिळविण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी मागणी रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे 22 मार्चपासून शासनाने खासगी प्रवासी वाहतूक बंद केली असून त्यामुळे विक्रम चालक-मालकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. बँकांचे हप्तेही थकले असून त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. यासाठी शासनाने विक्रम, मिनीडोअर, इको, टाटा मॅजिक गाडी वाहतूक सुरू करावी तसेच विक्रम, मिनोडोअर चालकांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्याकडे केली आहे.

Check Also

कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सुधारणा व तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील …

Leave a Reply