अलिबाग : प्रतिनिधी निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे.
अलिबाग : प्रतिनिधी
निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. तंत्रज्ञान सर्वांना सहज उपलब्ध आणि सुलभ झाल्याने सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून निवडणूक काळात तक‘ारींचा ओघ वाढणार असल्याने तत्काळ प्रतिसाद द्या, असा संदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ’ंगळवारी
(दि. 19) अलिबाग ेथे दिला.
राजस्व सभागृहात निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी ते चर्चा करीत होते. प्रारंभी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. तक‘ारींचा वाढता ओघ येऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांचे निराकरण लगेच करावे त्याचप्रमाणे मतदार यादी अचूक व परिपूर्ण असण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला असून याबाबतीतही मतदान नोंदणी अधिकारी यांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. या वेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी देखील सादरीकरण केले.
– रागड जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया सेंटर
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर राजस्व सभागृहासमोरच्या कक्षात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्ष (मीडिया सेंटर) सुरू करण्यात आले असून विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी या कक्षाची पाहणी केली. त्याचप्रमाणे सूचना दिल्या. या संपर्क कार्यालयाचे क‘मांक व ई-मेल लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या कक्षातून माध्यमांना नियमित स्वरूपात ब‘ीफिंग व्हावी, तसेच निवडणूकविषयक माहिती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सेंटरमध्ये मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया यावर पेड न्यूज व जाहिरातींच्या अनुषंगाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माध्यम प्रमाणीकरण कामदेखील या ठिकाणाहून सुरू होईल. जिल्हा माहिती कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेले कर्मचारी हे काम करणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या वेळी दिली. या ठिकाणी दूरदर्शन संच, संगणक, प्रिंटर, स्कॅनर्स, दूरध्वनी आदींची उपलब्धता असेल. जिल्हा माहिती अधिकार्यांमार्फत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर नियमितरीत्या या ठिकाणाहून बि‘फिंग होईल, तसेच आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदा देखील होतील, अशी माहिती अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी या वेळी दिली. या वेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, मु‘य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची उपस्थिती होती.
-आचारसंहिता भंग गंभीरपणे घ्या
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या आणि तसे होत असेल, तर तत्काळ कोणताही दबाव येऊ न देता कारवाई करा. वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे, परंतु त्यावरही सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे. सोशल मीडियावरील सर्व पोस्ट्स काळजीपूर्वक तपासल्या पाहिजेत, तसेच आलेल्या तक‘ारींवर लगेच कार्यवाही झाली पाहिजे. सुलभ, समाधान, सिव्हीजील अशी विविध अॅप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत, पुढे कदाचित आणखीही येतील. ती कशी हाताळायची याचे योग्य प्रशिक्षण घ्या अन्यथा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.
-लोकसभा निवडणूक प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक आहे, असे समजून काम करावे. सर्व पथकांनी एकमेकांत समन्वय ठेवणे खूप गरजेचे आहे. वरिष्ठ कार्यालयात तातडीने आणि वेळेत विविध निवडणूकविषयक अहवाल पाठविणे आणि तत्काळ प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कादा सुव्वस्थाही नीट राखणसाठी पोलीस आणि ’हसूल ंत्रणेने स’न्वाने का’ करणे गरजेचे आहे.
-डॉ. जगदीश पाटील, विभागी आुक्त