Breaking News

लग्नाच्या आधीच हुंड्यासाठी दबाव

नेरळमधील घटना; गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता आणि लग्न होण्याआधी नवरा तसेच त्यांच्या कुटुंबीय यांनी मुलीच्या वडिलांकडून 15 लाख आणि 25 तोळे सोन्याची मागणी केल्याने ती मागणी पूर्ण होत नाही हे पाहून ठरलेले लग्न मोडून टाकण्याची घटना घडली आहे.या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कल्याण येथील सहा व्यक्ती या हुंड्याच्या प्रकरणात आरोपी आहेत.

नेरळ गावातील एका तरुणीचे लग्न कल्याण येथील श्रीकांत प्रल्हाद राठोड या तरुणाबरोबर ठरले होते. त्यांचा साखरपुडा 15 मार्च रोजी झाला. त्या वेळी मुलीच्या वडिलांनी दोन लाख एक हजार रुपये वरपक्षाला दिले होते. साखरपुडा झाल्यानंतर लग्न मे महिन्यात करण्याचे ठरले असल्याने दोन्ही बाजूकडून लग्नाची तयारी सुरू होती. अशा वेळी साखरपुड्यानंतर कल्याण येथील मुलाकडील मंडळींनी मुलीच्या वडिलांकडे 25 तोळे सोने आणि 15 लाख रुपये हुंडा देण्यात यावा अशी मागणी केली. नवरदेव श्रीकांत प्रल्हाद राठोड तसेच त्याचे वडील प्रल्हाद बुधा राठोड, आशा प्रल्हाद राठोड, नवी मुंबईत राहणारे सरला आर. राठोड आणि आर. जी. राठोड यांच्याकडून हे पैसे मागण्यात आले, मात्र एवढे पैसे देऊ शकत नाही अशी भूमिका मुलीच्या वडिलांनी घेतली.

यावरून नवरदेव असलेला तरुण श्रीकांत राठोड आणि त्याचे आई-वडील तसेच अन्य दोघांनी नेरळ येथील मुलीच्या घरी येऊन साखरपुड्यासाठी आलेला आणि लग्नासाठी बुक केलेला हॉल आणि अन्य तयारीसाठी आलेला खर्च असे एकूण असे एकूण आठ लाख 10 हजार 658 रुपये देण्याची मागणी केली. श्रीकांत राठोड, प्रल्हाद राठोड, आशा राठोड, सरला राठोड, आर. जी. राठोड यांनी संगनमत करून साखरपुडा झालेला असूनदेखील ठरलेले फसवणूक केल्याबद्दल त्यांच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी लग्नाच्या आधी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply