Breaking News

पनवेल, श्रीवर्धनमध्ये भाजपतर्फे विशेष सहकार्य

स्वच्छता मोहिमेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळचाही सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रात चक्रीवादळ आणि अनलॉकमुळे वाढलेला कचरा आणि पालापाचोळा हटवून शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला मदत व्हावी, याकरिता भारतीय जनता पक्ष आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धनलाही सावरण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे सहकार्य करण्यात येत आहे.
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेलमधील या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे.
गेले दोन महिने कोविडच्या काळात होणारा कचरा त्या-त्या वेळी काढण्याचा प्रयत्न केला जात होता. आता लॉकडाऊन उठल्यानंतर पनवेल शहर आणि परिसरातील उपनगरांत नागरिकांची वर्दळ आणि वाहनांची रहदारी वाढल्यामुळे कचर्‍याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी टीआयपीएल या कंपनीतर्फे 25 डम्पर आणि दोन जेसीबी स्वच्छतेसाठी पनवेल महापालिकेला विनामोबदला देण्यात आले आहे.
शहराची परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या सर्व आजी व माजी पदाधिकार्‍यांची एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत पालिकेच्या विभागवार परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये पनवेल महापालिकेतील सर्वच विभाग आणि पनवेलची उपनगरे यांचा समावेश आहे. प्राप्त परिस्थितीत महापालिकेवर येणारा ताण कमी व्हावा आणि कोविडच्या दृष्टिकोनातूनही शहर स्वच्छ रहावे हा उद्देश या विशेष स्वच्छता मोहिमेमागचा आहे.
दरम्यान, श्रीवर्धनलाही दोन जेसीबी आणि बिस्कीटचे 25 हजार पुडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठवून दिले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply