पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि. 3) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी सरगम-जर्नी ऑफ म्युजिक हा संगीतम कार्यक्रम सर्वांना अनुभवयाला मिळाला.
या स्नेहसंमेलनास ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रार्चाय डॉ. गणेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, महेंद्र घरत, उलवे नोडमधील सौ. शंकुतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, ‘रयत’चे रायगड विभागीय निरीक्षक रोहिदास ठाकूर, पीआरओ बाळासाहेब कारंडे, तेजस जाधव, रंजिशा नायर, निशा नायर, प्रणिता गोळे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यात विद्यालयाचे वार्षिक मासिक ‘अंकुर’चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले, तसेच उत्तम कामगिरी बजावणार्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांना आदर्श मुख्याध्यापिका हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …