कर्जत : बातमीदार
देशाचे कार्यक्षम पंतप्रधान, विकासपुरुष नरेंद्र मोदी यांनी सलग दुसर्यांदा केंद्रात बहुमताने सत्ता स्थापन केली. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती भाजप कार्यकर्ते 30 मे ते 30 जून काळात घरोघरी पोहोचविणार आहेत.
देशाचे कर्तबगार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 असा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी दिली. पंतप्रधान मोदींचे दुसर्या टर्ममधील एक वर्ष 30 मे रोजी पूर्ण झाले. या काळात 370 कलम रद्द, श्रीराम मंदिर उभारणीस प्रारंभ, आधुनिक समाज व्यवस्थेत अडसर बनलेला तीन तलाक रद्द करणे, भारताच्या संवेदनशीलतेचे प्रतिक असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा, किसान सन्मान योजनेतंर्गत 9.5 कोटी शेतकर्यांच्या खात्यात 72 हजार कोटी रुपयांच्या निधीचे वाटप, असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी तीन हजार रुपये पेन्शन अशा एक ना अनेक योजना लागू केल्या. सध्याच्या जागतिक कोरोना महामारीस रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ठोस निर्णय घेतले. हे सर्व कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपने घेतला आहे.
सोशल डिस्टसिंन्ग पाळून भाजप कार्यकर्ते केंद्र सरकारची उपलब्धी 30 मे ते 30 जून काळात जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून एक लाख कुटुंबांपर्यंत संपर्क करण्यात येणार आहे तसेच इंटरनेटद्वारे जनसंवाद साधण्यात येणार आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पक्षाच्या विविध आघाड्या, सेलच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहेत. उत्तर रायगड जिल्ह्यात अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उत्तर रायगडमध्ये विधानसभेचे तीन मतदारसंघ असून, दोन भाजपकडे आहेत. पनवेलमध्ये या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर, तर उरणमध्ये आमदार महेश बालदी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे कर्जतमध्ये जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी नेतृत्व करणार आहेत.
सर्व तालुका व शहर मंडलमध्ये अभियान प्रमुख, सहप्रमुख अशी बूथस्तरापर्यंत रचना पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस तथा जनसंपर्क अभियानाचे जिल्हा संयोजक दीपक बेहेरे आणि जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा जनसंपर्क अभियानाचे सहसंयोजक प्रल्हाद केणी यांनी दिली.
Check Also
The member group is always indeed there to aid when needed
Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …
RamPrahar – The Panvel Daily Paper