पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 14) एकाच दिवसात कोरोनाच्या तब्बल 81 रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 44, पनवेल ग्रामीणमधील 13, कर्जत तालुक्यातील 10, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी चार, उरण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि मुरूड व तळा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल महापालिका हद्दीत खारघरमध्ये दोन आणि कळंबोलीत एक तसेच तळा येथील एक असे आहेत. वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1790वर जाऊन पोहचला असून, मृतांची संख्या 78 इतकी झाली आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …