Breaking News

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 14) समोर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तो 34 वर्षांचा होता. करिअरच्या शिखरावर असताना त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे, मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करीत त्याने करिअरला सुरुवात केली होती. 2009मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घराघरांत पोहचला. 2013मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. याशिवाय त्याने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी सुशांतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो डिप्रेशनमध्ये होता. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वात  हळहळ व्यक्त होत आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply