अलिबाग ः प्रतिनिधी
पोयनाड विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पोयनाड येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत झुंझार युवक मंडळ पोयनाडचा क्रिकेट संघ अंतिम विजयी संघ ठरला आहे. पोयनाड संघाने घरच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जय गणेश आंबेवाडी संघावर मात करीत कै. प्रकाश मालोजी चवरकर स्मृतिचषक जिंकला. तृतीय क्रमांक बीसीसी तीनविरा, तर चतुर्थ क्रमांक मरीआई लेभी संघाने पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम व चषक असे पारितोषिक देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळ करणारा अष्टपैलू खेळाडू विनोद पाटील (तीनविरा) याला मालिकवीर, अंतिम लढतीचा सामनावीर विशाल निषाद (पोयनाड), उत्कृष्ट फलंदाज चिराग पाटील (लेभी), उत्कृष्ट गोलंदाज जयेश पाटील (आंबेवाडी) यांनाही गौरविण्यात आले.