पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 19) कोरोनाच्या तब्बल 101 रुग्णांची नोंद झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पनवेल महापालिका हद्दीत 65, पनवेल ग्रामीणमध्ये 20, माणगाव तालुक्यात पाच, पेण तालुक्यात चार, उरण तालुक्यात तीन, खालापूर तालुक्यात दोन आणि कर्जत व अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे, तर मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीत कळंबोली, पनवेल ग्रामीणमध्ये आदई व उरण तालुक्यात करंजा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2168वर पोहोचला असून, मृतांची संख्या 94 झाली आहे. दुसरीकडे 44 रुग्ण दिवसभरात बरे झाले.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …