इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अलिबाग : जिमाका
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील कुशल व अकुशल उमेदवारांसाठी गुरुवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजन करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लिक करून सर्व अद्यावत माहिती भरून नवीन नोंदणी करावी, नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login‘ܶo मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन ङेसळप वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणार्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील झरपवळीं ऊळपवरूरश्र णरिवहूरू गेल ऋरळी वर क्लिक करुन दिसणार्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपला जिल्हा निवडून रलींळेपर्-ींळशु वशींरळश्री मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व र्ींरलरपलू श्रळीींळपस मध्ये ढशीाी रपव उेपवळींळेपी मधील ख रसीशश वर क्लिक करुन रिक्त पदांची माहिती पहावी व अिश्रिू ऑप्शनवर क्लिक करावे त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल. आपण रिक्त पदांकरीता अिश्रिू वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्याकरिता आपणाशी संपर्क साधणे शक्य होते, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार यांनी दिली असून संबंधितास काही समस्या असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी (क्रमांक 02141-222029) वर संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.