Breaking News

नुकसानग्रस्त बागायतदारांना भाजपकडून ऑटो कटरचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडलेली झाडे कापण्यासाठी भाजपतर्फे बागायतदारांना  ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. उन्मळून पडलेली झाडे कापण्याचे सध्या बागायतदारांसमोर मोठे आव्हान आहे.  अशा वेळी भाजपकडून रविवारी विभागवार ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बागायतदारांना वाड्या साफ करणे सोपे होईल. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते हेमंत दांडेकर, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, राज्य परिषद सदस्य सतीश लेले, उदय काठे, शहराध्यक्ष अ‍ॅड. अंकित बांगेरा, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, शौकीन राणे, आठवले आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply