खालापूर ः प्रतिनिधी
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी भाजप उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 1000 बॉटल्स रक्तदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यात भाजप खालापूर अध्यक्ष बापू घारे व भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वावरले येथे रविवारी (दि.21) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला.
या शिबिरास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, खालापूर तालुका कोषाध्यक्ष अरुण पारठे, तालुका चिटणीस नंदू सोनावणे, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, वडगाव जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप पाटील, सरपंच विश्वनाथ पाटील, अंजरून ग्रामपंचायत सदस्य विकास रसाळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदिश आगीवले यांची विशेष उपस्थिती होती. या कामी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील मुकादम, महेश कडू, बळीराम ठोंबरे, नागेश पाटील, आकाश मुसळे, अतुल शेलार, मनोज पारठे व विशाल लोते यांनी विशेष मेहनत घेतली.