पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन एप्रिल आणि मे 2021 मध्ये केले होते. या स्पर्धांपैकी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. 24) प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका वर्षा नाईक, नगरसेविका सुशिला घरत आणि विज्ञान विषयतज्ञ विश्वास कोरडे यांच्या हस्ते झाला.
सीकेटी इंग्रजी माध्यमिक विभागाने बाल वैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले होते. सीकेटी प्राथमिक विभागाने चित्रकला स्पर्धांचे तर सीकेटी पूर्व प्राथमिक विभागाने वेशभुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी विश्वास कोरडे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विज्ञान प्रकल्प कसा असावा या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मुख्याध्यापिका निलीमा शिंदे, पर्यवेक्षिका नीरजा अदुरी, संध्या अय्यर, विज्ञान विषय शिक्षक आदी उपस्थित होते.
विजेत्यांची नावे-
पूर्व प्राथमिक विभाग
रिधान सागर घरत (लिटिल चॅम्प्स इंग्लिश स्कूल), योगेश शेवाले (सीकेटी विद्यालय), प्रज्ञा रोहित तांबोली, दुष्यंत गणेश यादव (एमएनएम विद्यालय), रुद्र राजेंद्र कुमार ठाकूर, हर्षद अजित रांबाडे, अथर्व जीवाबा पवार, अनन्या नारायण ठाकूर, पल्लव आशिष म्हात्रे (सीकेटी विद्यालय), वेद विकास मर्गाजे (सीकेटी विद्यालय), विहान मिलिंद वास्कर (सेंट विल्फ्रेड स्कूल), स्पृहा सुयोग हामाने (सीकेटी विद्यालय).
प्राथमिक विभाग
प्राप्ति महेश पाटील (बीसीटी स्कूल, द्रोणागिरी), नेहांता अमित कदम, श्राव्या अमर थले (सीकेटी विद्यालय), मधुरास शीतल कुमार कांबळे (आरटीपीएस स्कूल, खारघर), आदित्य नितीन माने (सुधागड एज्युकेशन सोसायटी स्कूल, कळंबोली), उदिपपण बिस्वास देबजनी (आरटीपीएस स्कूल, खारघर), कैवल्या भारतभूषण पाटील (सीकेटी विद्यालय), आयुषी सचिन कापसे (सीकेटी विद्यालय), संस्कृती अलंकार घरत (बीसीटी स्कूल, द्रोणागिरी), उपासना बिस्वास देबजनी (आरटीपीएस स्कूल, खारघर).
माध्यमिक विभाग विजेते
घोषवाक्य स्पर्धा विजेते : अथर्व भोसले (एमएनआर स्कूल, कामोठे), कौशल मनोज गोसावी (सीकेटी विद्यालय, इंग्लिश मीडियम), तन्वी राजेंद्र महाकाल (बीसीटी विद्यालय, द्रोणागिरी), चेतन म्हात्रे (सीकेटी विद्यालय, इंग्लिश मीडियम), आयुष शिरीष म्हात्रे (सीकेटी विद्यालय, इंग्लिश मीडियम).
भित्तीपत्रके स्पर्धा : प्रज्ञा अविनाश वर्मा (रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर), दीती जैन (रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर), पद्मजा राजेंद्र धोंडे (एमएनआर स्कूल, कामोठे), अखिल विनय दुबे (रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर), शुभम सुशील पास्वान (न्यू इंग्लिश स्कूल).
रिसर्च पेपर स्पर्धा विजेते : आर्यन कुमार सिन्हा (रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर), निर्जरा गावंड (बीसीटी विद्यालय, द्रोणागिरी), कूलाज्ञा पावणेकर (आरएसएस न्युज इंग्लिश स्कूल, कामोठे), दिव्यता मडवी (सीकेटी जुनियर कॉलेज, नवीन पनवेल), शहीस्ता सुभा (रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर).