अलिबाग ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडलेली झाडे कापण्यासाठी भाजपतर्फे बागायतदारांना ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. उन्मळून पडलेली झाडे कापण्याचे सध्या बागायतदारांसमोर मोठे आव्हान आहे. अशा वेळी भाजपकडून रविवारी विभागवार ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बागायतदारांना वाड्या साफ करणे सोपे होईल. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते हेमंत दांडेकर, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, राज्य परिषद सदस्य सतीश लेले, उदय काठे, शहराध्यक्ष अॅड. अंकित बांगेरा, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, शौकीन राणे, आठवले आदी उपस्थित होते.
Check Also
खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …
RamPrahar – The Panvel Daily Paper