उरण : वार्ताहर – दिवसेंदिवस उरण तालुक्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण व्हावे, त्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने व भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील धुतुम गावातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने गावात रविवारी (दि. 28) जंतुनाशक फवारणी करवून घेतली.
या कामी आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, पुंडलिक ठाकूर, रामदास ठाकूर, विक्रम ठाकूर, हसुराम ठाकूर, अर्जुन ठाकूर, चंद्रकांत कडू, अनिल ठाकूर, निलेश ठाकूर, राम ठाकूर, स्नेहल ठाकूर, चंदू ठाकूर, साई ठाकूर, भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक यांचे सहकार्य लाभले.
फवारणीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडचा वापर केला जात आहे. या फवारणीमुळे उरण तालुक्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या साखळीला खंडित केले जाईल, आमचे प्रेरणास्थान उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने व मदतीने जंतुनाशक फवारणीचे काम झाले आहे, असे भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी सांगितले.