नागरिकांच्या समस्येचे भाजप नगरसेवकांकडून निवारण
कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे सेक्टर 34 येथील रिकाम्या प्लॉटवर खड्डे व झाडी, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी तसेच साप देखील बाहेर येत असतात. परिसरातील सोसायटींच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात स्थानिक भाजप नगरसेवक विकास घरत व डॉ. अरुणकुमार भगत यांच्याकडे समस्या मांडली. त्यावेळी भाजपच्या तत्पर नगरसेवकांनी संबंधित परिसर जेसीबीच्या सहाय्याने व्यवस्थित करुन घेतला.
कामोठ्यातील सेक्टर 34 मध्ये रिकाम्या प्लॉटवर खड्डे आहेत. सिडकोने गेल्या बारा तेरा वर्षात या खड्ड्याकडेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते तसेच मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढतात. साचलेल्या पाण्यामुळे डास मच्छरचे प्रमाण देखील वाढते तसेच या खड्ड्यातून साप देखील बाहेर येतात. त्यामुळे दर पावसाळ्यात या परिसरातील नागरिक भयग्रस्त होतात. रविवारी (दि% 28) शिवकृपा सोसायटी, तुलसी अवेनु सोसायटी, प्रगती हाइट्स, शिवगंगा सोसायटी, साई प्रेम सोसायटी या सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि रहिवासी यांनी प्रभात क्रमांक 13 चे नगरसेवक विकास घरत आणि डॉ. अरुण कुमार भगत यांच्याकडे आपली समस्या मांडली.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या नगरसेवकांनी तात्काळ हालचाली करून सोमवारी (दि. 29) जेसीबी आणून प्लॉट नंबर 88, 89 या मोकळ्या जागेवर वाढलेली झाडे, झुडपे इतर कचरा साफ केला. तसेच जेसीबीचा वापर करून जेसीबीचा वापर करून खड्डे भरून घेतले. सोसायटीच्या वॉल कंपाऊंड ला बाहेरील बाजूने मातीच्या भरावा चा आधार दिला. यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
झाडेझुडपे साफ करणे, खड्डे भरून घेणे हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतः नगरसेवक विकास घरत जातीने उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत सेक्टर 34 मधील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संजय पाटील तसेच शेखर जगताप, मोहन पोटे इत्यादी उपस्थित होते. या वेळी नगरसेवक विकास घरत यांनी सेक्टरमधील इतर मोकळ्या प्लॉटची सफाई देखील करून घेतली जाईल, असे आश्वासन दिले.