पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 30) कोरोनाचे तब्बल 263 रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 127, पनवेल ग्रामीणमधील 54, अलिबाग तालुक्यातील 23, खालापूर तालुक्यातील 21, रोहा तालुक्यातील 16, उरण तालुक्यातील 12, महाड तालुक्यातील सहा कर्जत तालुक्यातील तीन आणि मुरूड तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. मयत रुग्ण पनवेल मनपा हद्दीतील आहे. दुसरीकडे, दिवसभरात 142 रुग्ण बरे झाले आहेत. ‘अनलॉक’पासून रुग्ण व मृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3946वर जाऊन पोहोचला आहे, तर मृतांची संख्या 134 झाली आहे.
Check Also
आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper