पनवेल : वार्ताहर
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील तरूण वर्ग हा घरीच असल्याने त्यांचे लक्ष आता वल्गनीचे मासे पकडण्याकडे लागले आहे. मोठ्या प्रमाणात या दमदार पावसात हे मासे पकडण्यासाठी तरूण वर्ग ग्रामीण भागातील नदीकिनारी, ओव्हळ, नाले, शेती क्षेत्राच्या रस्त्यावर दिसत आहेत.
सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकजण हा आपआपल्या घरी सुरक्षित आहे. बरेच दिवस घरी बसल्याने त्याच त्याच मनोरंजनाच्या साधनांनी जो तो कंटाळला आहे. त्यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार सुरवात केल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. याशिवाय वल्गनीचे मासे चढण्यासाठी चांगला पाऊस झाल्याने व योग्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदी काठचे ओळे, सखल भाग व शेती क्षेत्राचे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे दिसून आल्याने तरूणाई मोठ्या प्रमाणात मासेमारी करून पावसाळ्यातील वल्गनीचा आनंद घेत आहेत.