Breaking News

टेम्पोने रेल्वे फाटक तोडले वाहतूक काहीकाळ बंद

कर्जत : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकापुढील कर्जत दिशेकडे असलेले रेल्वे फाटक तेथून वाहतूक करणार्‍या टेम्पोचालकाने तोडले. त्यानंतर त्या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती. मध्य रेल्वे कडून त्या टेम्पोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे फाटकाला धडक देणारा टेम्पो रेल्वे सुरक्षा दलाच्या
ताब्यात आहे. नेरळ-कर्जत या मार्गावर नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे गेट नंबर – 27 हे फाटक आहे.हे फाटक नेरळ पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारे महत्वाचे फाटक आहे. दिवसभर या फाटकातून वाहनांची वर्दळ सुरू असते. दुपारी एक वाजता नेरळ पूर्व भागातून नेरळ बाजार पेठ मध्ये एक टेम्पो फाटक ओलांडून जात होता. (एमएच 05 – आर 8001) या क्रमांकाचा टेम्पो भंगाराच्या साहित्य तेथून जात होते, मात्र त्या टेम्पोवरील लोखंडी साहित्य हे रेल्वे फाटकाच्या लोखंडी खांबाला धडकले आणि त्यामुळे रेल्वे फाटक अर्धवट मोडून पडले. त्याचा परिणाम त्या ठिकाणी रेल्वे फाटकांचे ऑपरेशन करून तेथील बी केबिनमध्ये बसणार्‍या रेल्वे कामगाराला शक्य नव्हते. त्यामुळे त्या फाटकातून होणारी वाहतूक दुपारी एक वाजता बंद पडली. यानंतर नेरळ रेल्वे स्थानकात असलेले आरपीएफ जवान यांनी फटकळ धडक देणारा टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला असून या प्रकाराने नेरळ पाडा येथे फाटक क्रमांक 27 हे तब्बल अडीच तास बंद होते. या प्रकरणात फाटक तोडणार्‍या टेम्पो सध्या रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply