Breaking News

पनवेल तालुक्यात 205 जण बाधित; 216 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 13) कोरोनाचे 205 नवीन रुग्ण आढळले असून 216 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी 146 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून  181  रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीण मध्ये 59 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 35  रुग्णानी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोलीत 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 672 झाली आहे.  कामोठे मध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 878 झाली आहे. खारघरमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 766 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 642 झाली आहे. पनवेलमध्ये 38  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 799 झाली आहे.  तळोजामध्ये 13  नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णाची संख्या 223  झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 3960 रुग्ण झाले असून 2496 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.71 टक्के आहे  1388 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 96 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी 59  नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 35 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे सात, करंजाडे पाच, सुकापुर पाच, विचुंबे पाच, शिरढोण चार, कुंडेवहाळ चार, सावळे तीन, आदई दोन, खेरणे दोन, सोमटणे दोन, आकुर्ली, आपटे, बेलवली, भाताण, बोर्ले, भिंगार, भोकरपाडा, चिंध्रण, दिघाटी, केळवणे, खानावळे, कुडावे, गव्हाण, गीरवले, नेरे, मालेवाडे, पळस्पे, पालेबुद्रुक, साई, वावंजे येथे प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. 

कर्जत तालुक्यात सात जणांना लागण; एक रुग्ण दगावला

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात सोमवारी सात जणांचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या 262 वर पोहोचली असून मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 12

झाली आहे.

आढळलेल्या आकडेवारी कर्जत शहरातील कोतवाल नगरमध्ये 64 वर्षीय व्यक्ती व 30 वर्षीय महिला,  भिसेगाव मधील एक 69 वर्षाच्या व्यक्ती, मुंबई महापालिकेत नोकरी करीत असलेल्या एका व्यक्तीला 9 जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती त्या व्यक्तीच्या पत्नी व सुनेचा कोरोना झाला आहे. कडाव येथील 28 वर्षीय महिला, नेरळ नजीकच्या जिते गावात राहणारा 45 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

नवी मुंबईत 233 नवे रुग्ण

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत सोमवारी 233 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण संख्या नऊ हजार 678 झाली आहे. तर 152 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या पाच हजार 804 झाली आहे. सोमवारी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 305

झाली आहे. 

सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 569 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 35, नेरुळ 39, वाशी 20, तुर्भे 15, कोपरखैरणे 34, घणसोली 27, ऐरोली 47 व दिघा 16 असा समावेश आहे.

उरण तालुक्यात 35 नवे रुग्ण; 28 जणांना डिस्चार्ज; तिघांचा मृत्यू

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळले असून 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर

तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये जसखार सहा, नवघर तीन, घारापुरी तीन, मोरा तीन, चिरनेर तीन, बोरी दोन, वाणी आळी, कोटनाका, डाऊर नगर, म्हातवली, करंजा सुरकीचापाडा, चिर्ले, जासई, वेश्वी, दिघोडे, पाणदिवे, कळंबुसरे, हनुमान कोळीवाडा, बोकडवीरा, सोनारी, सावरखार येथे प्रत्येकी एका

रुग्णाचा समावेश आहे.

तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये उरण(गोकुळधाम सोसायटी) सहा, बोकडवीरा तीन, जसखार दोन, नवीन शेवा दोन, धुतूम दोन, उरण(पोलीस स्टेशन), उरण(बालई श्री. राम समर्थ सोसायटी), कोटनाका, म्हातवली, करंजा सुरकीचापाडा, दिघोडे, मोरा, बेलदार वाडा, चिरनेर, सोनारी, जेएनपीटी, पागोटे, पाणजे, चिर्ले येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर जेएनपीटी, सोनारी, उरण येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या  513  झाली आहे. त्यातील 314  बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 186  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 13 कोरोना  पॉझिटिव्ह  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे  यांनी दिली.       

महाडमध्ये दोघांना कोरोना

महाड : प्रतिनिधी       

महाड तालुक्यात सोमवारी दोन नवीन रुग्णांची नोंद झाली असून, पाच जण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच महाडचे प्रसिद्ध वकिल अ‍ॅड. प्रशांत साबळे यांचा पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

महाड तालुक्यातील वरंध या गावातील 30 वर्षीय पुरुष आणि वहूर गावातील 58 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकुण 39 रुग्ण उपचार घेत असुन, 66 जन बरे झाले आहेत, तर 10 जनांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात एकुण 115 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाडचे प्रसिद्ध वकिल प्रशांत मदन साबळे वय 56 व त्यांची पत्नी यांना कोरोनाची लागण झाली होती.

  • अ‍ॅड. प्रशांत साबळे यांची झुंज अपयशी

महाडमधील सुप्रसिद्ध तरूण वकील अ‍ॅड. प्रशांत साबळे यांचे सोमवारी दुपारी पुणे हॉस्पिटल पुणे येथे उपचारा दरम्यान साबळे यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सूरू होते. अगदी कमी वयात त्यांनी महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात वकिली व्यवसायात उत्तम नावलौकिक मिळवला होता.

देशात 28 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी

(दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत 24 तासांत तब्बल 28 हजार 701 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 500 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे 18 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तब्बल 63 टक्क्यांहून अधिक लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल दोन लाख 54 हजार 427वर पोहोचला आहे. सध्या एक लाख तीन हजारांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण एक लाख 40 हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत 10 हजारहून अधिक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply