Breaking News

भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी अनिल मोरे

पोलादपूर : प्रतिनिधी

बुध्दिस्ट सोसायटी ऑॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी पोलादपूर येथील साप्ताहिक रायगड वैभवचे संपादक अनिल बाबू मोरे यांची निवड जाहीर झाली आहे. 

या वेळी म्हसळा येथील संतोष जाधव यांची सरचिटणीसपदी आणि माणगांव येथील विजय बा. जाधव यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. दक्षिण रायगड विभागात म्हसळा, श्रीवर्धन, महाड, माणगांव,रोहा, पोलादपूर, तळा या तालुक्यांचा

समावेश आहे.

महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री भिकाजी कांबळे, विद्यमान अध्यक्ष यु.जी. बोराडे, रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे पालकमंत्री सुशिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत ही निवड झाल्याचे बौध्द महासभेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष यु जी. बोराडे यांनी ऑॅनलाइन रायगड जिल्हा दक्षिण विभाग या विभागाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर केली.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply