Breaking News

पोलिसाच्या गाण्याची माजमाध्यमांवर चर्चा

पनवेल : बातमीदार

सध्या समाजमाध्यमांवर पनवेलमधील एका पोलीस अधिकार्‍याने ‘शोर’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले ‘एक प्यारका नगमा है’ या गाण्याची चर्चा जोरात आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी रविवारी हे गाणे पुणे येथील एका स्टुडिओत जाऊन ध्वनिमुद्रित केले. गेल्या 20 तासांत 1200 जणांनी हे गाणे पाहिले आणि ऐकले.

पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे गुन्हेगारीशी लढाई. रुक्ष कार्यपद्धती हा त्यातील एक भाग. परंतु, गायकवाड यांनी या खात्यात कर्तव्य बजावताना स्वत:मधील हळवा कोपरा कायम जिवंत ठेवला. आठ तासांच्या ‘ड्युटी’तून सैलावल्यावर गाण्याचा रियाज होताच. पण तरीही ही कला सादर करण्याची संधी मिळाली नाही. ती गायकवाड यांनी वयाच्या 54व्या वर्षी साधली. त्यांच्या गोड गळ्याचे सध्या पोलीस दलात कौतुक होत आहे.बारामती येथे शालेय शिक्षण आणि मग टी. सी. महाविद्यालयात पदवी शिक्षण झाले. बालपणीच त्यांच्यात गानकळा विकसित होऊ लागली. शाळेत प्रार्थना सुरात गाणारा विद्यार्थी असा त्यांचा लौकिक होता. त्यानंतर त्यांनी गाणे फक्त मनातच ठेवले आणि पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी पोलीस दलात आजवर अनेक सन्मान मिळविले आहेत. जनजागृती करण्यासाठी भोंग्यावरून त्यांनी अनेक सूचना ‘स्वरबद्ध’ केल्या. कोरोनाकाळात एका हवालदाराचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी माइक घेऊन गाणे सादर केले. त्यानंतर त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना गाणे ध्वनिमुद्रित करण्यासाठी आग्रह धरला. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांनी वर्गणी गोळा करून गायकवाड यांच्याकडून स्टुडिओत गाणे गाऊन घेतले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply