Breaking News

पनवेल तालुक्यात 187 नवीन रुग्ण

 दोघांचा मृत्यू, 207 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 26) कोरोनाचे 187 नवीन रुग्ण आढळले असून 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 135  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 150 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यातआले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 52 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 57 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1034 झाली आहे. कामोठेमध्ये 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1220 झाली आहे. खारघरमध्ये 17 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1136 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 985  झाली आहे. पनवेलमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1137 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 359 झाली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 5871 रुग्ण झाले असून 4325 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.67 टक्के आहे. 1396 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात उलवे आणि पाले बुद्रुक येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवीन 52 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे 13, गव्हाण नऊ, करंजाडे सात, सुकापूर पाच, आदई दोन, आजिवली दोन, हेदुटणे दोन, कोळवाडी दोन, बेलवली, काळोखे, नेरे, दापोली, डेरवली, कुंडेवहाळ, न्हावा खाडी, तुराडे-पोसरी, शिरढोण, तरघर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दिवसभरात 57 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1880 झाली असून 1447 जणांनी कोरोनावर मात केली असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 30 जणांना संसर्ग

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात रविवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळले असून तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 787 झाली आहे. तर दिवसभरात असे एकूण 45 रुग्ण बरे झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी तीन, बोरी तीन, उरण(कामठा) दोन, नागाव दोन, वशेणी दोन, सोनारी तीन, बोकडवीरा दोन, म्हातवली दोन, सावरखार, जसखार, जासई, उरण, उरण (मोरा रोड), उरण(साई अपा. आनंदनगर), जेएनपीटी, फुंडे, उरण (वाणीआळी), करंजा 1, मुळेखंड(तेलीपडा) येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यात एकूण 607 रुग्ण बरे झाले आहे. फक्त 158 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

रोहा तालुक्यात 35 जणांना लागण

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यात रविवारी 35 कोरोना बाधीत आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे रोहा तालुक्याची एकुण रुग्ण संख्या 486 वर पोहचली आहे.

यामध्ये रोहा शहरात 26 तर ग्रामीण भागात नऊ व्यक्ती कोरोना बाधीत आढळले आहेत. 26 पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. 15 वर्षा आतील तीन व 60 वर्षांवरील आठ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच रविवारी कोरोनावर 12 व्यक्तींनी मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 326 वर पोहचली आहे. आतापर्यंत 11 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

अलिबाग तालुक्यात 94 जण कोरोनामुक्त

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यात संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी तब्बल 94 जणांनी कोरोनावर मात केली. 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 602 आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या 889  झाली असली तरी प्रत्यक्षात 264  रुग्णांवर तालुक्यात उपचार सुरू आहेत. 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. आज कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

आढळलेल्या रुग्णांमध्ये आरसीएफ कॉलनी दोन, बोरपाडा दोन, चेंढरे चार, नवखार सुडकोली, चिंचवली, वेश्वी, तळवडे,  वरसोली कोळीवाडा, नवगांव, बोडणी, डोंगरे हॉलजवळ,  सारळ  आणि वाघ्रण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply