Breaking News

पनवेल तालुक्यात 154 नवे कोरोनाग्रस्त

पाच जणांचा मृत्यू; 250 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल ः प्रतिनिधी 

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाचे 154 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  दिवसभरात 121 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 210 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 33 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 40  रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

कळंबोली सेक्टर-1 ई गृहसंकल्प सोसायटी, सेक्टर-8 श्री सत्यम सोसायटी व सेक्टर-4 कैलास कॉम्प्लेक्स, खांदा कॉलनी सेक्टर-8, नवरत्न सोसायटी आणि पनवेल ओम सदनिका, उरण नाका  येथील व्यक्तींचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 24  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1159 झाली आहे. कामोठेमध्ये 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1373 झाली आहे. खारघरमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 1282 झाली.

नवीन पनवेलमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 1128 झाली आहे. पनवेलमध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1285, तर तळोजामध्ये सहा  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 411 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 6628 रुग्ण झाले असून, 5157 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.81  टक्के आहे. 1306 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 33 रुग्ण आढळले आहेत. उलवे सात, विचुंबे पाच, करंजाडे, देवद प्रत्येकी तीन, आकुर्ली, आजीवली, उसर्ली खुर्द प्रत्येकी दोन, तर सुकापूर, मोसारे, कुंडेवहाळ, कुडावे, कोन, काळोखे, गव्हाण आणि भोकरपाडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2088 झाली असून 1643 जणांनी कोरोनावर मात केली, तर  45  जणांचा मृत्यू झाला आहे.

रोहा तालुक्यात 13 कोरोनाबाधित

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. शुक्रवारी 28 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होत घरी गेले आहेत. बरे होण्याची संख्या वाढल्याने रोहाकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रोहे तालुक्यात शुक्रवारी 13 कोरोनाबाधित आढळल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 564वर पोहचली आहे. तालुक्यात 28 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होत घरी गेल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 420 झाली. रोह्यात आतापर्यंत 15 व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. 129 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 13 कोरोनाबाधितांत रोहा शहरात पाच, तर ग्रामीण भागातील आठ व्यक्तींचा समावेश आहे.

कर्जत तालुक्यात तहसीलदारांच्या चालकासह 18 जण पॉझिटिव्ह

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. तहसीलदारांचा चालकसुद्धा कोरोनाबाधित झाला आहे. त्याच्यासह शुक्रवारी (दि. 31) कर्जत तालुक्यात 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आजपर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या पाचशे पार म्हणजे 505वर पोहचली आहे. 379 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर 18 जणांचा मृृत्यू झाला आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात आठ, कर्जत नगर परिषद क्षेत्रात नऊ आणि माथेरान नगर परिषद हद्दीत एक रुग्ण आढळला. यामध्ये मुद्रे बुद्रुकमधील एका इमारतीत राहणार्‍या 49 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती कर्जत तहसीलदारांची वाहनचालक आहे. मुद्रे खुर्दमध्येही एका 40 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली असून हा तरुण वीट उत्पादक व बांधकाम साहित्य पुरवठादार आहे. कोतवाल नगरमध्ये एका औषधाचे दुकान चालविणार्‍या  46 वर्षीय व्यक्तीचा व त्याच्या 22 वर्षांच्या पुतणीचा आणि 17 वर्षीय पुतण्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कर्जत बाजारपेठेतील दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या 57 वर्षीय पत्नी व 27 वर्षीय मुलालाही कोरोनाची बाधा झाली. माथेरानमध्ये एका 82 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नेरळनजीकच्या बेकरे गावातील एका 50 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता तिच्या 19 वर्षीय मुलीचा व 17 वर्षांच्या मुलाचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. नेरळमध्ये कर्जत-कल्याण रस्त्यानजीक राहणार्‍या एका 51 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. ही व्यक्ती ग्रामपंचायतीची माजी सदस्य आहे. शेलू येथील 40 वर्षांच्या युवकाला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती माजी सरपंच होती. उमरोलीतील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. भिवपुरी रोड उकरूळमधील 32 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली. बीड-नेवळी येथील 24 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोतवाल नगरमधील 33 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आहे. म्हाडा वसाहतीत राहणार्‍या 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती एसटी कर्मचारी आहे. कर्जतमध्ये एका 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

उरणमध्ये 17 नवे रुग्ण

उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 21 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत एकदंत अपार्टमेंट पाच, डोंगरी तीन, चिरनेर, कोप्रोली प्रत्येकी दोन, नागाव, डाऊरनगर कीर्तन अपार्टमेंट, भवरा, करंजा रोड, मुळेखंड कोळीवाडा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांत डोंगरी सात, जेएनपीटी, पाणजे, उरण प्रत्येकी दोन, तर बोरी उरण, कोप्रोली, घारापुरी, मोरा, जासई, नागाव, फुंडे, दिघोडे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. हिंदू कॉलनी नागाव व वाणी आळी येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता 869 इतकी झाली आहे. त्यातील 671 बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 40 रुग्ण कोरोनामुक्त

महाड ः प्रतिनिधी

महाडमध्ये शुक्रवारी (दि. 31) तब्बल 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर नऊ जणांना कोरोनाची लागण झाली. शुक्रवारी कोणाचाही मृत्यू झाला नाही. यावरून कोरोनाविरोधातील लढाईत महाडकरांची सरशी होताना दिसते. ओमसाईनगर बिरवाडी, कुंभारकोंड नाते, मधले आवाड, नवीन वसाहत करंजखोल, वरंध, तांबडभुवन महाड, श्रीराम मंदिर चवदार तळे, सरेकर आळी, तांबडभुवन वेताळवाडी येथील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. 95 रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून 298 जण पूर्ण बरे झाले आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply