मुंबई : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात शुक्रवारी (दि. 10) कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार गेली आहे, तर एकट्या मुंबईतील कोविड रुग्णांचा आकडा दोन हजारच्या नजीक येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर सक्रीय रुग्णांचाही संख्या वाढली आहे. राज्यात शुक्रवारी तीन हजार 81 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 24 तासांमध्ये मुंबईत एक हजार 956 जणांना कोरोना झाला आहे. राज्यात सध्या 13 हजार 229 जणांवर उपचार सुरू आहेत. झपाट्याने वाढणार्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून आहे. कोरोना आटोक्यात येताना दिसत नाहीये. त्यासोबतच साथीचे आजारही वाढले आहेत. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …