Breaking News

एसटी सेवा सुरू करण्यासाठी ‘वंचित’चे डफली बजाव आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी

गावागावात एसटी सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रायगड जिल्ह्यात बुधवारी

(दि. 12) डफली बजाव आंदोलन करण्यात आले. अलिबागमध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडक उपस्थितीत हे आंदोलन झाले.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासह जिल्ह्यातील आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. सर्व उद्योगधंद्यांसह हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली एसटी सेवा अद्यापही ठप्प आहे. त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, खेड्यांचा शहरांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील आजारी व्यक्तीलाही उपचारासाठी शहरात आणणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी डफली बजाव आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला साद देत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील एसटी आगाराच्या आवारात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात अन्य काही ठिकाणीही हे अनोखे आंदोलन झाले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply