Breaking News

खालापूरात लाखाची गावठी दारू जप्त

खोपोली : प्रतिनिधी : खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टी विरोधात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगङे यांनी मोहीम उघङली असून सुमारे लाखाची गावठी दारू नष्ट करीत, चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

खालापूर तालुक्यातील इरशाळ गडाचे पायथ्याशी असलेल्या इरशाळ वाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकारी ङॉ रणजित पाटील आणि पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रसाद पाटील, खंङागळे, रूपनवर यांनी साध्या वेशात छापा टाकला असता, पाच इसम  गावठी हातभटटीची दारू तयार करताना मिळून आले.  मात्र पोलिसांची चाहुल लागताच झाडीझुडपाचा फायदा घेवून ते पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 82,600 रुपये किमतीचा  गावठी दारूचा माल जप्त केला आहे. तसेच पळून गेलेल्या पाच इसमांचा शोध घेवून त्याना अटक केली आहे.दुसरा छापा बोरीमाळ ठाकूरवाडी येथे  टाकून एकूण 12,100  रुपये किमतीचा गावठी दारू तयार करण्याचा माल आढळला. हातभटटीची तयार दारू व दारू गाळण्याचे साहित्य भांडी, दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा उग्रवास मिश्रित द्रव पदार्थ असा माल विनापरवाना गैरकायद्याने जवळ बाळगल्यामुळे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

Check Also

भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …

Leave a Reply