Breaking News

कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ङ्गबफ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्याची परिस्थिती पाहता कोरोना या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी गर्दी होऊ न देणे याकरीता आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने खांदा कॉलनी परिसरातील हजारोंच्या संख्येने स्थापन होणार्‍या घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ङ्गबफ चे सभापती संजय भोपी यांनी मा. आयुक्त साहेब, पनवेल महानगरपालिका आणि मा. कार्यकारी अभियंता, सिडको लि. यांना दिले असून गणेश भक्तांच्या भावनेचा आदर करून सामाजिक बांधिलकी जपत कृत्रिम तलावांची निर्मिती करून गणेश भक्तांसाठी गर्दी विरहित विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply