पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमधील तालुका क्रीडा संकुलात मनीषा मानकर यांच्या माध्यमातून खो-खो, हॅण्डबॉल आणि कबड्डी स्पर्धा शनिवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 5 ते 10 वयोगटातील खेळाडूंसाठी घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, तालुका क्रीडा संकुल येथील हॅण्डबॉल कोच प्रशांत महल्ले, संगम दंगर, मनीषा मानकर, अस्मिता मगर आदी उपस्थित होेते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन घडत आहे, असे म्हटले.