मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. मुंबई, रायगड जिल्ह्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे आणि पालघर जिल्ह्याच्या वसईतील मिठागर परिसरात अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी (दि. 5)देखील अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगडसह अन्य काही जिल्ह्यांतील शाळांना तेथील जिल्हाधिकार्यांनी सुटी जाहीर केली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …