Breaking News

माणकिवली-कडाव रस्त्याची स्वच्छता

तरुणांचे श्रमदान

कर्जत ः बातमीदार 

कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कडाव-मानकिवली भागात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे वाढली होती. त्या अनुषंगाने सामाजिक कार्याची आवड असलेल्या ओमकार पवार या तरुणाने आपल्या मित्रांना सोबत घेऊन माणकिवली-कडाव रस्त्यावर वाढलेली जंगली झाडेझुडपे काढून टाकली.  

कडाव-माणकिवली रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात जंगली झाडेझुडपे वाढली होती. त्याचा त्रास ग्रामस्थांना आणि लहान मुलांना तसेच वयोवृद्धांना होत असे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाढलेल्या जंगली झाडाझुडपांतून विषारी साप रस्त्यावर येत होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्याची आवड असलेल्या ओमकार पवारने आपले सहकारी गणेश ओंबासे, राहुल गंगावणे व प्रफुल गंगावणे यांच्या सहकार्याने माणकिवली-कडाव रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेली जंगली झाडेझुडपे आणि वाढलेले गवत काढले. या कामासाठी त्यांनी गवत कापण्याची मशिन तसेच अन्य साहित्याचा वापर केला. या तरुणांच्या मेहनतीमुळे मुख्य रस्ता पूर्ववत अखंड दिसू लागला. या कामाबद्दल ग्रामस्थांनी तरुणांचे कौतुक केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply