कर्जत ः प्रतिनिधी
कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसर्या वर्षी पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. बोरसे हे हा बहुमान मिळविणारे एकमेव भारतीय ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे हे 48वे आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आहे.यंदाही कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची निवड झाल्याने सलग तीन वर्षे या संस्थेतर्फे निवड होणारे पराग बोरसे एकमेव भारतीय ठरले आहेत. 2018, 2019 आणि 2020 अशा सलग तीन वर्षांतील प्रदर्शनांसाठी पराग बोरसे यांच्या चित्रांची निवड करण्यात आली. या प्रदर्शनात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली, कोरिया, जर्मनी, चीन अशा अनेक देशांतील चित्रांची निवड करण्यात आली आहे.