Breaking News

टोकेखार-सावली रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील टोकेखार-सावली रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. पावसाळ्यात या डोंगरातील दगड व मातीचे थर रस्त्यावर येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मुरूड-रोहा मार्गावरील टोकेखार ते सावली या भागात मोठा डोंगर असून तो रस्त्यालगतच आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडतात. गेल्या पावसाळ्यातही डोंगराच्या दगड, मातीचा थर या रस्त्यावर आला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतून दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. आठ डंपर, चार जेसीबी यांची मदत घेऊन रस्त्यावरील मलबा हटविण्यात आला होता. हा दरडींचा धोका दूर करण्यासाठी या रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यता आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणार्‍या प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा संपला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांकडून

होत आहे. मुरूड येथून अलिबाग, मुंबईला जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील विहूर व चिकणी येथील पुलांवरून एकमार्गी वाहतूक सुरू आहे. या पुलांच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. हे काम जलदपणे पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply